आज महाराष्ट्रात आनंदी आनंद होता. संपूर्ण महाराष्ट्र वसंत ऋतूच्या सुखद वातावरणात गढून गेला होता.निसर्गात अत्तराचा सुवास दरवळत होता. झाडे बहरली होती , टपोरी फुलेसुद्धा आज घडणाऱ्या आनंदोत्सवाचे गाणे गात होती. महाराष्ट्राच्या कन्यारत्नाचे आज बारसे.त्याचीच ही सगळी तयारी सुरू होती. बाळासाठी इथल्या मातीचा पाळणा केला. तरुलतांनी त्यावर तोरण चढवले.
दूधसागर आपला नगारा घुमवीत होता , वारा मधुर बासरी वाजवीत होता, अर्णवाच्या लाटांनी मंत्रोच्चार सुरू केले होते.
बाळाला आशीर्वाद द्यायला
पंढरीचा पांडुरंग आला. टाळ,मृदुंगाच्या गजराने संपूर्ण आसमंत भारावून शुद्ध झाला. कोल्हापूरची महालक्ष्मी काजळ घेऊन आली. तिने बाळाच्या डोळ्यात काजळ घातले,"किती गोड दिसतंय नाही!!"ती म्हणाली. तुळजापूरहून आई भवानी तीट लावायला आली. तिने बाळाच्या भाळी तीट लावले"आता बाळाला कशाचीच दृष्ट लागणार नाही" ती म्हणाली. माहूरची रेणुका आई पाळणा गाण्यास आली. जेजुरीचे खंडेराय आले. म्हाळसाई बाणाई लिंबलोणं उतरवण्यास आल्या.मोरगावचा मोरेश्वर आला,वेरुळचा घृष्णेश्वर आला.
सह्याद्री आणि सातपुड्यांनी बाळाच्या हातात बिंदल्या आणि मनगट्या घातल्या. पुढील अनेक वर्षे यांच्यात तर अंगणात बाळ खेळणार आहे, बागडणार आहे,मोठं होणार आहे.
कृष्णा,गोदा,वर्धा,इंद्रायणी यांनी बाळाच्या पायात चाळवाळे घातले.
पवना,पूर्णा, तापी,भीमा,पुष्पावती यांनी पाळणा दिला.
जिच्यासाठी ही सारी मंडळी खोळंबली होती ती वीणापुस्तकधारिणी, विश्वमोहिनी, जगद्वव्यापीनी शारदा आली. बाळाची दृष्ट काढली गेली. औक्षण झाले आणि आपल्या मधुर आवाजात तिने बाळाच्या कानात नाव सांगितले . दाही दिशांनी ते नाव त्रिखंडात पोहचवले...
*ii मराठी ii*
(संदर्भासाठी मदत - राजा शिवछत्रपती, महाराष्ट्राचा भौगोलिक इतिहास आणि आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टी)
सुंदर
ReplyDeleteउत्तम... छान लिखाण...
ReplyDeleteछान लिहिलेस...
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteउत्तम
ReplyDeleteVeryyyy nice amogh..keep it up 😊
ReplyDeleteKhup Masst����
ReplyDeleteVery nice writing ..If you want to write an unknowable .
ReplyDeleteKamaal ahe! 💙
ReplyDeleteMasta re moghya❤
ReplyDeleteChhaan!:)
ReplyDeleteSundar kalpana, ani titkech chhan lihile ahes ��
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप सुंदर!
ReplyDeleteउत्तम प्रयत्न❤️💫
ReplyDeleteछान रे!
ReplyDeleteKhup masta lihilays...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान लिहीले आहेस अमोघ!!! सारे द्रृष्य डोळ्या पुढे उभे राहिले!!!!
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteअमोघ, फारच सुंदर लिहिलं आहेस!!!!! असंच लिहीत रहा!!!!!
ReplyDeleteसुंदर लेख आहे मित्रा.
ReplyDeleteKhupch chaan.. Mast.. Keep it up amogh..!!
ReplyDeleteKhup chan amogh..!!
ReplyDeleteफक्त वर्णन नाही, तर भाषेतलं सौंदर्य ही टिपलंयस भावा 👍👌
ReplyDeleteफक्त वर्णन नाही, तर भाषेतलं सौंदर्य ही टिपलंयस भावा 👍👌
ReplyDeleteKhup Chan dada,varnan apratim👌👌👍
ReplyDeleteमस्त रे :)
ReplyDeleteभावा... जिंकलंस रे... अप्रतिम आणि ओघवती लेखनशैली. All the best!
ReplyDeleteKhupach sunder varnan ahe!!
ReplyDeleteजबरदस्त ������
ReplyDeleteजबरदस्त 👌👌👌
ReplyDeleteखूपच छान!!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआहा! सुंदर!
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteKhup chan lihil ahes 👌👌👌👌
ReplyDeleteChan lihila ahes
ReplyDeleteखूप छान लिहिलंय...
ReplyDeleteKhupach Chan lihila aahes
ReplyDeleteUttaam❤️❤️
ReplyDeleteकमाल!
ReplyDeleteAprtim varnan
ReplyDeleteUttam atishay uttam..mitra...kharach khas lihilays
ReplyDelete